शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 28 डिसेंबर 2022 (14:34 IST)

100व्या कसोटीत द्विशतक झळकावल्यानंतर अपघातात डेव्हिड वॉर्नर जखमी

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे खेळवला जात आहे. मंगळवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने शानदार द्विशतक झळकावले. दुहेरी शतक झळकावून त्याने आपली 100वी कसोटी संस्मरणीय केली. कसोटी इतिहासात अशी कामगिरी करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी जो रुटने भारताविरुद्ध १००व्या कसोटीत द्विशतक झळकावले होते. 200 धावा पूर्ण केल्यानंतर वॉर्नरने छान सेलिब्रेशन केले. 
.
सेलिब्रेशन करताना वॉर्नर एका छोट्या अपघाताचा बळी ठरला. हवेत उडी मारल्यानंतर त्याने पाय जमिनीवर ठेवल्यावर त्याला सरळ उभे राहता येत नव्हते. त्याच्या डाव्या पायात ताण आला होता. तो वेदनेने ओरडू लागला. वॉर्नरला त्याचा सहकारी फलंदाज ट्रॅव्हिस हेडने साथ दिली. यानंतर वैद्यकीय पथक मैदानावर पोहोचले. त्यानंतर त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले. वॉर्नर निवृत्त दुखापतग्रस्त. त्याने 254 चेंडूत 200 धावा केल्या. यादरम्यान त्याने 16 चौकार आणि दोन षटकार मारले.
 
Edited By - Priya Dixit