DC vs MI : दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा 29 धावांनी पराभव केला
12 वा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने मुंबईला 193 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात मुंबईला 20 षटकांत 8 गडी गमावून 163 धावा करता आल्या.
दिल्ली कॅपिटल्सने मुंबईविरुद्धचा सामना 23 धावांनी जिंकला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबईला 20 षटकांत 8 गडी गमावून 163 धावा करता आल्या. दिल्लीविरुद्ध मुंबईची फलंदाजी काही विशेष करू शकली नाही. अमनजोत कौर वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. या विजयासह दिल्ली गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे.
मुंबई इंडियन्सची सुरुवात धक्कादायक झाली. प्रथम फलंदाजीला आलेली यस्तिका भाटिया तीन चेंडूत सहा धावा करून बाद झाली.दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध 20 षटकांत 4 गडी गमावून 192 धावा केल्या. मेग लॅनिंग आणि मारिझान कॅप यांनी झंझावाती अर्धशतके झळकावली.
Edited By- Priya Dixit