1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 27 सप्टेंबर 2018 (08:43 IST)

धोनी चिडला म्हणाला 'बॉलिंग करेगा या बॉलर चेंज करे'

मिस्टर कुल महेंद्र सिंग धोनी सहसा त्याच्या सहकारी मित्रांवर ओरडत नाही, किंवा सिनिअर असल्याचा रुबाब दाखवत नाही. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा मैदानावरचा राग पुन्हा एकदा स्टंम्पच्या माईकमध्ये कैद झाला असून, खेळाडूंना सूचना देण्याचं काम धोनी खूपच वेगळ्या अंदाजात करतो. धोनी क्रिकेटच्या मैदानावर नेहमी जागृत राहून काम करतो. तो कर्णधार नाशिक तरीही पद नसताना देखील तो कर्णधाराला सूचना करताना नेहमी दिसतो. महेंद्र सिंह धोनी विकेट्सच्या मागे कमेंट करण्यासाठी देखील ओळखला जातो. आशिया कप 2018 मध्ये अफगानिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याचा आवाज पुन्हा एकदा माईकमध्ये कैद झाला आहे. यात झाले असे कि रोहित शर्मा, शिखर धवनला विश्रांती दिली गेली होती. धोनीकडे यासामन्याची जबाबदारी होती. धोनीने या सामन्यात कर्णधाराची भूमिका बजावली. जेव्हा कुलदीप यादव गोंलदाजी करत होता. तेव्हा फिल्डींग लावत असताना तो बराच वेळ घेत होता. तेव्हा धोनीने त्याला सूचना दिली. धोनी म्हणाला की बॉलिंग करेगा या बॉलर चेंज करे. हे ऐकताच कुलदीपने लावलेला उशीर लक्षात आला आणि त्याने निमुटपणे काम करत गोलंदाजीस सुरवात केली.