शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (13:31 IST)

पाकिस्तानचे माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने किवी संघाविरुद्ध संथ फलंदाजीबद्दल ऋषभ पंतवर केलीटीका

पाकिस्तानचे माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात ऋषभ पंतच्या संथ फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पंतने 20व्या षटकातील चौथ्या चेंडूवर चौकार मारून भारताचे मन जिंकले. पण इंझमामने त्याच्या संथ खेळीबद्दल टीका केली. पंतने 17 चेंडूत 17 धावा केल्या. त्यांना वाटते की पंत हे एमएस धोनीसारखे आहे, हे  पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर खेळून चमत्कार करू शकतात. पण युवा यष्टिरक्षकाने त्यांना  फारसे प्रभावित केले नाही.
 
इंझमाम त्यांच्या  यूट्यूब चॅनलवर म्हणाले , 'मला ऋषभ पंतकडून खूप आशा होत्या. गेल्या दोन वर्षांत त्यांनी जी कामगिरी केली आहे, मी त्यांचे  खूप कौतुक केले आहे. मी त्यांना ऑस्ट्रेलियात खेळताना पाहिले, त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा इंग्लंडने भारताचा दौरा केला तेव्हा. ज्या परिस्थितीत ते  खेळले. मला वाटले की जेव्हा टॉप ऑर्डर अपयशी ठरते तेव्हा ते खालच्या ऑर्डरमध्ये धोनीप्रमाणे भरपाई करतात. मला पंत देखील धोनी प्रमाणे वाटत होते. पण विश्वचषकादरम्यान ते माझ्या अपेक्षेप्रमाणे राहिले नाही.
पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने आशा व्यक्त केली की, युवा यष्टिरक्षक-फलंदाज आगामी काळात आपल्या खेळात नक्कीच सुधारणा करतील. भारत 19 नोव्हेंबर 2021 रोजी न्यूझीलंड विरुद्ध किवी संघ विरुद्ध दुसरा T20 सामना खेळणार आहे. पंतबाबत ते म्हणाले की पंत दबावाखाली दिसत होते. याआधीही त्यांच्यावर दबाव होता पण ते यातून बाहेर पडण्याचा नेहमीच प्रयत्न करतात.