रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 27 जुलै 2020 (11:54 IST)

बीसीसीआय अध्यक्षपदावर गांगुलीने 2023 पर्यंत राहावेः गावसकर

भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी सांगितले की, विद्यमान बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि त्याच्या सहकार्यांनी 2023 पर्यंत आपापल्या पदावर राहिले पाहिजे. गांगुलीने जसे 2000 च्या खराब टप्प्यातील कठीणसमयी अडचणींचा सामना करणार्या भारतीय संघाला सावरले होते, क्रिकेटप्रेमींची आता पुन्हा त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे.
 
गावसकर म्हणाले, मला गांगुलीला बीसीसीआयच्या अध्यक्षपदी राहिलेले पाहावास आवडेल. त्याच्यासह त्याच्या सहकार्यांेनीही 2023 च्या विश्वचषकाच्या शेवटपर्यंत पाहणे मला आवडेल.
 
गावसकर यांनी वृत्तपत्रात लिहिलेल्या कॉलममध्ये म्हटले आहेकी, बीसीसीआय आणि त्यांच्या काही मान्यता प्राप्त संघांद्वारे दिलेल्या निवेदनांच्या सुनावलीला स्थगित करण्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे भारतीय क्रिकेटला अनिश्चिततेच्या स्थितीत ढकलण्यात आले आहे. निश्चितपणे देशाच्या सर्वोच्च न्यायालयापुढे क्रिकेटपेक्षाही अनेक महत्त्वाच्या घटना आहेत. मात्र भारतीय क्रिकेटप्रेमी उत्सुकतेने निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांनी पुढे लिहिले आहे की, व्यक्तीगतरीत्या मला सौरव आणि त्याच्या सहकार्यांनी भारतात 2023 मध्ये होणार्या विश्वचषकाच्या अखेरपर्यंत त्याच्या पदावर पाहणे आवडेल. मात्र पाहूया की न्यायालयाचा निर्णय काय येतो.
 
गांगुलीने जसे सुरूवातीला कठीण काळानंतर भारतीय संघाला उंचावर नेले होते आणि भारतीय क्रिकेटप्रेमींचा विश्वास पुन्हा प्राप्त केला होता. त्याप्रमाणेच तो व त्याचे सहकारी बीसीसीआय प्रशासनासमवेत असेच करण्यात सक्षम आहेत.