बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 4 मार्च 2023 (20:10 IST)

GG W vs MI W : गुजरात जायंट्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या सत्रातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात खेळला जात आहे. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. मुंबईची कमान अनुभवी हरमनप्रीत कौरच्या हाती आहे. ती भारतीय संघाची कर्णधारही आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी गुजरातचे नेतृत्व करत आहे. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
 
मुंबई इंडियन्सचा डाव सुरू झाला आहे. यास्तिका भाटिया विंडीजच्या हिली मॅथ्यूजसोबत सलामीसाठी मैदानात उतरली आहे. गुजरातचे पहिले षटक अॅशले गार्डनरने केले.
 
गुजरात जायंट्स: बेथ मुनी (c/wk), सबिनेनी मेघना, हरलीन देओल, अॅशले गार्डनर, अॅनाबेल सदरलँड, दयालन हेमलता, जॉर्जिया वेरेहम, स्नेह राणा, तनुजा कंवर, मोनिका पटेल, मानसी जोशी.
 
मुंबई इंडियन्स: हरमनप्रीत कौर (क), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नताली सिव्हर-ब्रंट, हीली मॅथ्यूज, पूजा वस्त्राकर, इस्सी वोंग, हुमैरा काझी, अमेलिया केर, अमनजोत कौर, जिंतिमनी कलिता, सायका इशाक.
Edited By - Priya Dixit