1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 6 नोव्हेंबर 2017 (10:58 IST)

जन्मदिनानिमित्त कोहलीवर शुभेच्छांचा वर्षाव

happy birthday virat
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा आज 29 वा वाढदिवस आहे. देशभरात विराटचा वाढदिवस त्याचे चाहते मोठ्या उत्साहात  सेलिब्रेट करणार हे नक्कीच. पण रात्री 12 वाजता ड्रेसिंग रुममध्ये केक कापून विराटचा वाढदिवस साजरा करण्यात आला. 
भारतीय  क्रिकेट टीममधील आजी व माजी खेळाडूंनी त्याला ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत. तुझे पुढचे आयुष्य अतिशय सुखाचे जावो असे म्हणत असे म्हणत त्याला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. लहानपणापासून क्रिकेटची आवड असलेल्या विराटला वडिलांनी या क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रोत्साहन दिले.