भज्जीनं चुलीवर स्वत: जेवण बनवून घेतला पिठलं भाकरीचा स्वाद
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने नाशिकमध्ये स्वतः जेवण बनवत पिठलं भाकरीचा भाकरीचा आस्वाद घेतला आहे. भज्जीने पिठलं भाकरीचे कौतुक करत'पुन्हा येईन' असही म्हटले.
त्र्यंबकरोडवरच्या गावरान स्टाईल हॉटलेमध्ये हरभजनने स्वत: चुलीवरचं जेवणं बनवलं. हरभजनचे नाशिकमधले काही फोटो समोर आले आहेत ज्यात तो स्वत:च्या हाताने स्वयंपाक करताना दिसत आहे.
भज्जीने त्र्यंबकरोडवरील हॉटेल संकृतीला भेट देत स्वतः जेवण बनवले. यावेळी त्याने त्र्यंबकेश्वरला भेट दिली. मंदिर दर्शन आणि पूजेनंतर हरभजन सिंगने जेवण करण्यासाठी नाशिक त्र्यंबक रस्त्यावरील बेळगाव ढगा परिसरात हॉटेल संस्कृतीला भेट दिली तेव्हा स्वतः किचनमध्ये जाऊन चुलीवर महाराष्ट्राचा प्रसिद्ध मेनू असेलला पिठलं भाकरी तयार करुन त्याचा आस्वाद घेतला. मुख्य म्हणजे महाराष्ट्रीय पद्धतीने हरभजन पाटावर जेवणासाठी बसला.
हरभजन सिंगने क्रिकेटच्या सगळ्या प्रकारामधून निवृत्ती घेतली आहे. यानंतर त्याने राजकारणात प्रवेश केला. 18 जुलै 2022 ला हरभजनने आम आदमी पक्षाकडून राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली.