शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जुलै 2022 (21:40 IST)

Harbhajan Singh: हरभजन सिंग क्रिकेटच्या मैदानावर इरफान पठाण आणि युसूफ पठाण सह परतणार

Harbhajan singh
भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंग क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करणार आहे. तो पुन्हा एकदा आपल्या फिरकीची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. हरभजन यावर्षी सप्टेंबरमध्ये लिजेंड्स क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेचा हा दुसरा हंगाम असेल. हरभजन भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग, माजी अष्टपैलू इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांच्यासोबत सहभागी होणार आहे.
 
लिजेंड्स क्रिकेट लीगमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली, श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये इंग्लंडला विश्वविजेते बनवणारा कर्णधार इयॉन मॉर्गन देखील खेळताना दिसणार आहेत. स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रात चार संघ सहभागी होणार आहेत. यात एकूण 110 माजी क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत.