शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 29 जून 2022 (15:46 IST)

29 जुलैला झळकणार ‘एक व्हिलन रिटर्न्स’

अर्जुन कपूर, जॉन अब्राहम, तारा सुतारिया आणि दिशा पाटनीचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘एक व्हिलन रिटर्न्स’मधील या सर्व कलाकारांचा फर्स्ट लुक आउट झाला आहे. निर्मात्यांसह या सर्व कलाकारांनी सोशल मीडियावर चाहत्यांकरता स्वतःचा फर्स्ट लुक सादर केला आहे.

अर्जुनने चित्रपटातील स्वतःचे पोस्टर शेअर केले असून यात तो अत्यंत इंटेन्स दिसत असून त्याच्या हातात एक मास्क आहे. ‘व्हिलनच्या जगात, हीरोचे अस्तित्व नाही, एक व्हिलन 8 वर्षांनी येतोय’ असे त्याने म्हटले आहे.
जॉन अब्राहमने देखील ‘एक व्हिलन रिटर्न्स’चे पोस्टर शेअर केले असून यात एक स्माइलीयुक्त मास्कद्वारे स्वतःचा चेहरा झाकलेला दिसून यतो. हा चित्रपट 29  जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती त्याने दिली आहे. चित्रपटात तारा सुतारिया देखील मुख्य भूमिकेत आहे. ताराने स्वतःचा लुक सादर करत चाहत्यांची उत्सुकता वाढविली आहे. दिशाने स्वतःचा लुक प्रेक्षकांसमोर सादर केला आहे. यात ती हातात मास्क धरून आणि त्याद्वारे स्वतःचा निम्म्याहून अधिक चेहरा झाकलेल्या स्थितीत दिसून येते.