गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 4 मे 2024 (00:23 IST)

ICC चा वार्षिक संघ रँकिंग जाहीर, ऑस्ट्र्रेलिया कसोटीत अव्वल स्थानावर

Cricket_740
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) शुक्रवारी वार्षिक संघ रँकिंग अपडेट जाहीर केले. यामध्ये ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर आहे, तर भारताने एकदिवसीय आणि टी-20 या दोन्ही मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. तर कसोटी क्रमवारीत टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे. गतवर्षी ओव्हल येथे झालेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या विजेतेपदाच्या सामन्यात विद्यमान कसोटी विजेत्या ऑस्ट्रेलियाने भारतावर 209 धावांनी शानदार विजय नोंदवला होता. त्याने भारताला मागे टाकून वार्षिक अपडेटमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे.

ऑस्ट्रेलियाचे या क्रमवारीत 124 गुण आहे. हा संघ भारतापेक्षा 120 म्हणजे चार गुणांनी पुढे आहे. इंग्लड 105 तिसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिका 103 , श्रीलंका 83 , वेस्टइंडीज 82 आणि बांग्लादेश 53 व्या स्थानकावर आहे. 
 
भारताने (122 गुण) कसोटी संघ क्रमवारीत अव्वल स्थान गमावले आहे, परंतु वनडे आणि टी20 मध्ये अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया 116 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिका 112 आहे. पाकिस्तान 106 आणि न्यूजीलँड 101 पहिल्या पाच मध्ये आहे. तर श्रीलंका सातव्या स्थानावर 93 , इंग्लड सहाव्या स्थानावर 95 आहे. तर बांगलादेश86 , अफगाणिस्तान 80 आणि वेस्टइंडीज 69 चा संघ टॉप 10 च्या यादीत आहे. 
 
T20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत, ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडला दुसऱ्या स्थानावर टाकले आहे परंतु 264 रेटिंग गुण मिळवलेल्या भारतीय संघापेक्षा सात गुणांनी मागे आहे. दक्षिण आफ्रिका चौथ्या स्थानावर असून इंग्लंडपेक्षा दोन गुणांनी मागे आहे. न्यूझीलंडचेही दक्षिण आफ्रिकेप्रमाणे 250 गुण आहे.वेस्टइंडीजचे 249 गुण असून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लड आणि वेस्टइंडीज मध्ये तीन गुणांचा फरक आहे. पाकिस्तान सातव्या क्रमांकावर आहे. स्कॉटलंड ने मोठी झेप घेत झिम्बाबेला मागे टाकून टॉप 12 मध्ये स्थान पटकावले आहे. 

 Edited By- Priya Dixit