सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 मे 2024 (12:34 IST)

चेचीस नंबरशी करत होते छेडछाड, 3 RTO अधिकारीसोबत 9 जणांना अटक

महाराष्ट्र : पोलिसांनी सांगितले की, शहर गुन्हा शाखेने दुसऱ्या राज्यातून चोरल्या गेलेल्या वाहनांना फर्जी दस्तऐवज सोबत महाराष्ट्रामध्ये रजिस्टर केले गेल्याची सूचना मिळाली. यावर कारवाई करत पोलिसांनी कमीतकमी 5.5 करोड रुपयाचे 29 वाहन जप्त केले आहे. जे चोरी करून विकले गेले होते. 
 
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात पोलिसांनी गुरुवारी वाहनांची चोरी आणि चंचीस नंबरसोबत छेडछाड करून मग त्यांना विकणार्या एका टोळीला जेरबंद केल्याचा दावा केला  आहे. पोलिसांनी या प्रकरणात तीन आरटीओ अधिकारी सोबत नऊ लोकांना ताब्यात घेतले आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहराची गुन्हा शाखा ने दुसऱ्या राज्यातून चोरलेल्या वाहनांना फर्जी दस्तऐवज सोबत महाराष्ट्रात रजिस्टर केली जाण्याची सूचना मिळावी होती. या प्रकरणाची कसून चौकशी करत पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आता पर्यंत कमीतकमी 5.5 कोटी रुपयाचे 29 वाहने जप्त करण्यात आले आहे. जे चोरीचे होते मग विकण्यात आले.   
 
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार रॅकेटचा मुख्य आरोपीला छत्रपती संभाजी नगर मधून अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरुद्ध नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, धुळे,  मध्ये या प्रकारचेच गुन्हे दाखल आहे. पोलिसांनी सांगितले की, तो उत्तरप्रदेश आणि हरियाणा येथील अपराधांमध्ये सहभागी आहे. 
 
मुख्य आरोपी आणि अन्य आरोपी हे दुसऱ्या राज्यातून वाहन चोरून त्यांचे चेचीस आणि इंजिन नंबर यांना फर्जी नंबरने बदलत होते. पोलिसांनी गीतले की, वाहनांना नागपुर आणि अमरावती सारख्या शहरांमध्ये परिवहन कार्यालय मध्ये नोंदणी केली गेली होती. पोलिसांनी सांगितले की, अमरावती मध्ये एक सहायक आरटीओ अधिकारी आणि एक मोटार परिवहन निरीक्षक, एक सहायक मोटार परिवहन निरीक्षक यांना याप्रकरणात अटक करण्यात आली आहे. 

Edited By- Dhanashri Naik