मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 जानेवारी 2022 (18:23 IST)

ICC Women World Cup 2022:6 मॅचमध्ये शानदार बॅटिंग करूनही पूनम राऊतला टीम इंडियात जागा मिळाली नाही

बीसीसीआयने मार्चमध्ये न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या महिला विश्वचषक 2022 साठी टीम इंडियाची घोषणा केली होती. विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या 15 सदस्यीय संघात जेमिमा रॉड्रिग्ज आणि शिखा पांडे यांचा समावेश करण्यात आलेला नाही. याशिवाय विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या 15 सदस्यीय भारतीय संघात पूनम राऊतच्या नावाचाही समावेश नाही. निवड झाल्यानंतर काही वेळातच पूनम राऊतने मौन तोडले असून संघात स्थान न मिळाल्याने आपली व्यथा मांडली आहे.
 
संघात स्थान न मिळाल्याने पूनम राऊत चांगलीच निराश झाली आहे. उजव्या हाताच्या ओपन बॅट्समनने ट्विटरवर एका पोस्टद्वारे आपले मनोगत व्यक्त केले आहे. राऊतने ट्विटमध्ये लिहिले की, मी भारतासाठी अनुभवी फलंदाज आणि सातत्यपूर्ण धावा करणारा खेळाडू म्हणून ओळखली जाते आणि विश्वचषक संघाचा भाग नसल्यामुळे मी अत्यंत निराश आहे. 2021 मध्ये, मी 73.75 च्या सरासरीने 295 धावा केल्या, ज्यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता. राऊत एवढ्यावरच थांबली नाही, ती पुढे म्हणाली की, कामगिरी करूनही संघात निवड न झाल्याचा खंत नक्कीच आहे, पण असे असूनही, जे खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करतील त्यांना मी माझ्या शुभेच्छा देऊ इच्छिते. 
विश्वचषकापूर्वी भारतीय महिला संघ किवी संघाविरुद्ध 5 वनडे आणि एक टी-20 सामना खेळणार आहे. विश्वचषक स्पर्धेत एकूण 31 सामने खेळवले जाणार आहेत. विश्वचषकाचा पहिला सामना 4 मार्च 2022 रोजी वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह येथे खेळवला जाईल आणि 3 एप्रिल 2022 रोजी न्यूझीलंडमधील क्राइस्टचर्च येथील हॅगली ओव्हल मैदानावर अंतिम सामना खेळवला जाईल. भारत 6 मार्चला पाकिस्तानविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे.