1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 22 जुलै 2023 (15:52 IST)

IND A vs PAK : भारताने बांगलादेशचा 51 धावांनी पराभव केला, उद्या भारत पाकिस्ताचा सामना

india pakistan cricket
इमर्जिंग एशिया कप 2023 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताने बांगलादेशचा 51 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने या स्पर्धेत अजिंक्य राहताना अंतिम फेरी गाठली आहे. येथे त्याचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना 23 जुलै दुपारी 2 वाजे पासून कोलंबो स्टेडियम मध्ये होणार आहे. 
 
भारताने बांगलादेशचा 51 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. मानव सूटरने रिप्पन मोंडलला बाद करत बांगलादेशचा डाव 160 धावांत गुंडाळला. मोंडलने पाच धावा केल्या. भारतीय कर्णधार यश धुलने त्याचा झेल पकडून टीम इंडियाचा विजय निश्चित केला. स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 49.1 षटकात 211 धावा केल्या. भारताकडून कर्णधार यश धुलने सर्वाधिक 66 धावा केल्या. बांगलादेशकडून महेद, तंजीम आणि रकीबुल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
 
पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तानने श्रीलंकेचा 60 धावांनी पराभव केला आणि या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा पहिला संघ ठरला. आता भारताने दुसरा उपांत्य सामना जिंकून अंतिम फेरीतही मजल मारली आहे. 23 जुलै रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानचा आठ गडी राखून पराभव केला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी भारताने पाकिस्तानचा पराभव केला. अशा स्थितीत टीम इंडिया चॅम्पियन होण्यासाठी प्रबळ दावेदार आहे.
 Edited by - Priya Dixit