भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. पहिल्या दोन कसोटींनंतरच पॅट कमिन्सच्या आईची तब्येत बिघडली, त्यामुळे अखेरचे दोन कसोटी सामने सोडून तो ऑस्ट्रेलियाला परतला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी सकाळी ट्विट केले की, "मारिया कमिन्सच्या निधनामुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या वतीने आम्ही पॅट कमिन्सच्या कुटुंबियांना आणि मित्रांप्रती हार्दिक शोक व्यक्त करतो. ऑस्ट्रेलियन पुरुष संघाने आज आदराचे प्रतीक म्हणून काळा रंग परिधान केला आणि काळ्या हातपट्ट्या घालतील."We are deeply saddened at the passing of Maria Cummins overnight. On behalf of Australian Cricket, we extend our heartfelt condolences to Pat, the Cummins family and their friends. The Australian Men's team will today wear black armbands as a mark of respect.
— Cricket Australia (@CricketAus) March 10, 2023