मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 19 सप्टेंबर 2023 (07:29 IST)

IND vs AUS ODI: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

IND vs AUS
IND vs AUS ODI 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी वेगळ्या संघाची निवड केली आहे, तर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी निवडलेल्या संघात केवळ विश्वचषक संघात असलेल्या खेळाडूंनाच संधी देण्यात आली आहे.

मात्र, रविचंद्रन अश्विन तीनही एकदिवसीय सामन्यांसाठी संघाचा भाग आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर तो वनडे संघात परतला आहे. त्याने आपला शेवटचा एकदिवसीय सामना जानेवारी 2022 मध्ये खेळला होता. जून 2017 मध्ये भारतीय एकदिवसीय संघातून वगळल्यानंतर अश्विनने गेल्या सहा वर्षांत केवळ दोन एकदिवसीय सामने खेळले आहेत. अक्षर पटेल तिसऱ्या वनडेसाठी संघात आहे. मात्र त्याचा फिटनेस संशयाच्या भोवऱ्यात आहे. जर तो तंदुरुस्त नसेल तर अश्विन किंवा वॉशिंग्टन सुंदरला विश्वचषक संघात संधी मिळू शकते.
 
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ (पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी)
लोकेश राहुल (कर्णधार/विकेटकीपर) शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड,श्रेयस अय्यर, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर.
 
तिसऱ्या सामन्यासाठी
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर,लोकेश राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, कुलदीप यादव, अक्षर पटेल (फिटनेसबद्दल शंका) रविचंद्रन अश्‍विनी , वॉशिंग्टन सुंदर.
 
ही मालिका दोन्ही संघासाठी एकदिवसीय विश्वचषकसाठी प्रमुख आहे.या मालिकेत दोन्ही संघांना विश्वचषकाच्या तयारीला अंतिम स्वरूप द्यायचे आहे. या मालिकेतील पहिला सामना 22 सप्टेंबर रोजी मोहाली येथे होणार आहे. तर दुसरा सामना 24 सप्टेंबरला इंदूरमध्ये आणि तिसरा सामना 27 सप्टेंबरला राजकोटमध्ये होणार आहे. यानंतर हे दोन्ही संघ 8 ऑक्टोबरला विश्वचषकातही आमनेसामने येणार आहेत. एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांविरुद्ध स्पर्धा करून त्यांच्या मोहिमेची सुरुवात करतील.
 
 ऑस्ट्रेलियन संघात वरिष्ठ खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. नियमित कर्णधार पॅट कमिन्स, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल यांची निवड करण्यात आली आहे. कमिन्स, स्मिथ, स्टार्क आणि मॅक्सवेल दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळू शकले नाहीत. दुखापतग्रस्त ट्रॅव्हिस हेडचा 18 सदस्यीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. ट्रॅव्हिस हेडच्या जागी आलेल्या मार्नस लॅबुशेनला संघात ठेवण्यात आले आहे. दुखापतीमुळे स्टार्क आणि मॅक्सवेल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळू शकले नाहीत. दुखापतग्रस्त ट्रॅव्हिस हेडचा 18 जणांच्या संघात समावेश करण्यात आलेला नाही. 
 
भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस,कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिश, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा.
 







Edited by - Priya Dixit