सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 24 डिसेंबर 2020 (11:16 IST)

विराट कोहलीच्या पैटरनिटी रजेवरुन BCCIवर भडकले सुनील गावस्कर, वायरल झालेल्या Memes...

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियामधून मायदेशी परतला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया चार कसोटी बॉर्डर-गावसकर मालिका खेळत आहेत आणि पहिल्या कसोटीनंतर विराट पॅटर्निटी लीव्हवर मायदेशी परतला आहे. विराटने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) पितृत्व रजा मागितली होती आणि त्यांची मागणी मान्य केली गेली. विराटच्या पितृत्वाच्या रजेवरून वादाला तोंड फुटले आहे. काही दिग्गज क्रिकेटपटू त्यांच्या पितृत्वाच्या रजेच्या बाजूने आहेत तर काहींनी त्यासाठी ऐकवलेही आहे. दरम्यान, विराटच्या पितृत्वाच्या रजेसंदर्भात सुनील गावसकर यांनी बीसीसीआयला चक्क कटघर्‍यात उभे केले आहे. 
 
गावसकर यांनी बीसीसीआय आणि टीम मॅनेजमेंटवर ड्रेसिंग रूममधील खेळाडूंविरुद्ध भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की बीसीसीआयचे नियम सर्व खेळाडूंना सारखे नसतात. स्पोर्ट्स स्टारमध्ये लिहिलेल्या त्यांच्या स्तंभात गावस्कर म्हणाले की, 'आणखी एक खेळाडू, ज्याला या नियमाबद्दल आश्चर्य वाटले असेल, परंतु त्याने याबद्दल नक्कीच कोणतीही आवाज काढला नाही, कारण तो नवीन आहे. तो टी. नटराजन आहे. आयपीएल प्लेऑफ खेळला जात असताना तो प्रथमच वडील बनला. ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेसाठी तुम्ही येथे रहा, असे सांगीतले गेले होते, परंतु संघाचे सदस्य म्हणून नव्हे तर नेट गोलंदाज म्हणून. जरा विचार करा, सामना जिंकणारा, इतर स्वरूपात जरी, नेट गोलंदाज होण्यास सांगितले जाते. याचा अर्थ असा की तो जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यात कसोटी मालिका संपल्यानंतरच तो आपल्या घरी परतू शकणार आहे आणि पहिल्यांदाच मुलगी पाहू शकेल. आणि एकीकडे, कर्णधार त्याच्या पहिल्या मुलाच्या जन्माच्या पहिल्या टेस्टनंतरच परत जात आहे.
 
गावस्कर यांच्या या वक्तव्यानंतर चाहते सोशल मीडियावरही याविषयी बरीच कमेंट्स देत आहेत. काही मीम्स  वायरल देखील होत आहेत. लोकांनी अशी काही ट्विट केली- 
 

कसोटी मालिकेचा पहिला सामना एडिलेड येथे खेळला गेला, त्यात विराट कोहली खेळला. डे-नाइट टेस्टमध्ये टीम इंडियाला दुसर्‍या डावात 36 धावा करता आल्या. पहिल्या डावात आघाडी असूनही टीम इंडियाला आठ विकेटने डाव गमावले. ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे तर दुसरी कसोटी मेलबर्न क्रिकेट मैदानावर 26 डिसेंबरापासून खेळली जाणार आहे. उर्वरित तीन कसोटींमध्ये अजिंक्य राहणे टीम इंडियाचे नेतृत्व करेल.