रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 22 सप्टेंबर 2024 (13:28 IST)

IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी बांगलादेशचा 280 धावांनी पराभव करत भारताने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता 27 सप्टेंबरपासून ग्रीन पार्क, कानपूर येथे उभय संघांमध्ये दुसरा आणि अंतिम कसोटी सामना खेळवला जाणार आहे.
 
भारताने या कसोटी सामन्यासाठी तोच संघ कायम ठेवला आहे जो पहिल्या कसोटी सामन्यासाठी जाहीर करण्यात आला होता. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला दुसऱ्या कसोटीतून विश्रांती दिली जाईल, असे मानले जात होते, मात्र निवड समितीने त्याचाही संघात समावेश केला आहे. बुमराह व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज यश दयाल आणि आकाश दीप यांनीही आपली जागा कायम ठेवली आहे, तर सरफराज खान आणि यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल देखील संघासोबत असणार.या सामन्यात यश दयालला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाले नाही.  बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतून शमी पुन्हा मैदानात उतरू शकतो, मात्र या संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आलेला नाही.
 
भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.
Edited By - Priya Dixit