1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 25 डिसेंबर 2022 (10:57 IST)

Ind Vs Ban: श्रेयस-अश्विनने भंगले बांगलादेशचे स्वप्न, भारताने मालिका जिंकली

बांगलादेशविरुद्धची मीरपूर कसोटीही भारताने जिंकली आहे. सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारत हा सामना गमावू शकतो असे वाटत होते, परंतु श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विनच्या भागीदारीने टीम इंडियाची शान वाचवली आणि भारताने हा सामना 3 विकेटने जिंकला. यासह टीम इंडियाने मालिका 2-0 ने जिंकली आहे.
 
या सामन्यात बांगलादेशने भारताला 145 धावांचे लक्ष्य दिले होते. टीम इंडियाने चौथ्या दिवसाची सुरुवात 45-4 अशा स्कोअरने केली होती, पण बघता बघता त्याचे 3 विकेट गेले. अशा स्थितीत भारतावर पराभवाचे संकट ओढावले होते.  अखेरीस श्रेयस अय्यर (29), रविचंद्रन अश्विन (42) यांच्या अर्धशतकी भागीदारीने बांगलादेशचे स्वप्न भंगले. टीम इंडियाने मालिका 2-0 ने जिंकली 
 
पहिली एकदिवसीय: बांगलादेश 1 विकेटने जिंकली
दुसरी वनडे: बांगलादेश 5 धावांनी जिंकला
तिसरी वनडे: भारत 227 धावांनी जिंकला 
 
पहिली कसोटी: भारत 188 धावांनी जिंकली
दुसरी कसोटी: भारत 3 गडी राखून जिंकला 
 
बांगलादेशने दुसऱ्या डावात 231 धावा केल्या आणि भारतासमोर 145 धावांचे लक्ष्य ठेवले. या मालिकेत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये क्लीन स्वीप करून महत्त्वाचे गुण मिळवण्याच्या कसरतीत गुंतलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही  
आणि तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 बाद 45 धावा झाल्या होत्या. 
 
Edited by - Priya Dixit