रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 13 डिसेंबर 2022 (23:07 IST)

IND vs BAN Test : भारत सात वर्षांनंतर बांगलादेशात कसोटी खेळणार,सामना कधी आणि कुठे होणार जाणून घ्या

IND vs BAN : वनडेनंतर कसोटी मालिकेत भारत आणि बांगलादेशचे संघ आमनेसामने येणार आहेत. एकदिवसीय मालिकेत 1-2 ने गमावल्यानंतर टीम इंडियाला कसोटीत धमाकेदार सुरुवात करायची आहे. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल संघाची धुरा सांभाळणार आहे. राहुलच्या नेतृत्वाखाली भारताने यावर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक सामना खेळला. त्यात टीम इंडियाचा पराभव झाला.
भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध 11 कसोटी सामने खेळला आहे. यामध्ये त्याने नऊ विजय मिळवले असून दोन सामने अनिर्णित राहिले. 2015 नंतर भारतीय संघ बांगलादेशच्या भूमीवर कसोटी खेळणार आहे. 
 
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना 14 डिसेंबरपासून म्हणजेच बुधवारपासून  सकाळी 9.00 वाजता चितगावच्या जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
 
भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेचे प्रसारण करण्याचे अधिकार सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. सोनी स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर तुम्ही हिंदी आणि इंग्रजीशिवाय देशातील इतर भाषांमध्ये कॉमेंट्रीसह हा सामना पाहू शकता.
 
पहिल्या कसोटीसाठी दोन संघ पुढीलप्रमाणे आहेत:
बांगलादेश: नजमुल हसन शांतो, महमुदुल हसन जॉय, मोमिनुल हक, अनामूल हक, शकीब अल हसन (क), लिटन दास, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, इबादत हुसेन, खालिद अहमद, शोरीफुल इस्लाम, तस्किन अहमद, नुरुल हसन, यासिर अली, झाकीर हसन, रेझाउर रहमान राजा.
 
भारत : शुभमन गिल, केएल राहुल (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, श्रीकर भरत, जयदेव, जयदेव नवदीप सैनी, अभिमन्यू इसवरन, सौरभ कुमार.
 
 
Edited by - Priya Dixit