IND vs ENG 2nd T20:भारताने इंग्लंडचा 49 धावांनी पराभव केला, मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली
India vs England (IND vs ENG) 2रा T20 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना शनिवारी एजबॅस्टन येथे खेळला गेला. या सामन्यात विराट कोहली, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांनी टी-20 संघात पुनरागमन केले.नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 170 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 17 षटकांत 121 धावांवर गारद झाला.एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त विजय मिळवत टी-20 मालिका जिंकली आहे. भारताने इंग्लंडला 170 धावांचे लक्ष्य दिले होते, मात्र भारताच्या भक्कम गोलंदाजीसमोर इंग्लिश फलंदाज खेळू शकले नाहीत आणि भारताने हा सामना 49 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. एजबॅस्टनमध्येच टीम इंडियाला टेस्ट मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता आणि आता एजबॅस्टनमध्येच टी-20 सीरीज जिंकली आहे.
भारताने दुसऱ्या T20 मध्ये इंग्लंडचा 49 धावांनी पराभव केला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने रवींद्र जडेजाच्या नाबाद 46 धावांच्या जोरावर 20 षटकांत 8 बाद 170 धावा केल्या.कर्णधार रोहित शर्मासह यष्टिरक्षक ऋषभ पंतने भारताकडून डावाची सुरुवात केली.
इंग्लंडकडून नवोदित ग्लेसनने तीन तर ख्रिस जॉर्डनने चार बळी घेतले.लक्ष्याचा पाठलाग करताना संपूर्ण इंग्लिश संघ 121 धावांत गारद झाला.भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 3 बळी घेतले, तर जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी 2 बळी घेतले.रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने हा सलग 14 वा सामना जिंकला आहे.
भुवनेश्वर कुमार टीम इंडियाकडून गोलंदाजीत सर्वात मोठा हिरो ठरला, त्याने तीन बळी घेतले. भुवीने पुन्हा एकदा अप्रतिम स्विंग दाखवली आणि सुरुवातीला दोन्ही सलामीवीर लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. भुवनेश्वरने आपल्या स्पेलमध्ये फक्त 15 धावा दिल्या. यासाठी भुवीला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला.