1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 12 जुलै 2022 (21:44 IST)

IND vs ENG: जसप्रीत बुमराहची घातक गोलंदाजी; भारताकडून इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव

england - india
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने 10 गडी राखून जिंकला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 110 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 18.4 षटकात एकही विकेट न गमावता 114 धावा केल्या आणि विजय मिळवला. 
 
भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा 10 विकेट्सने पराभव केला. 111 धावांचे लक्ष्य भारतीय संघाने 18.4 षटकात एकही गडी बाद न करता पूर्ण केले. कर्णधार रोहित शर्माने 76 आणि शिखर धवनने 31 धावा केल्या. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा एकदिवसीय सामना 14 जुलै रोजी होणार आहे. 
 
या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि गोलंदाजांनी इंग्लंडला 110 धावांत गुंडाळत त्याला योग्य दाखवले. जसप्रीत बुमराहने सर्वाधिक सहा आणि मोहम्मद शमीने तीन बळी घेतले. प्रसिद्ध कृष्णाला विकेट मिळाली. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने सर्वाधिक 30 धावा केल्या.
 
जसप्रीत बुमराहने या सामन्यात आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्याने 19 धावांत सहा विकेट घेतल्या. एकदिवसीय क्रिकेटमधील भारताची ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. याआधी स्टुअर्ट बिन्नीने चार धावांत सहा विकेट्स आणि अनिल कुंबळेने 12 धावांत सहा बळी घेतले आहेत. त्याचबरोबर इंग्लंडविरुद्ध भारतीय गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी 2003 मध्ये आशिष नेहराने 23 धावांत सहा विकेट घेतल्या होत्या. 
 
या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि जसप्रीत बुमराहने आपल्या पहिल्याच षटकात दोन विकेट घेत रोहितचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले.