IND vs NZ Final : 12 वर्षांनंतर भारत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करेल
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आतापर्यंत अपराजित राहिलेला भारतीय संघ रविवारी जेतेपदाच्या सामन्यात न्यूझीलंडशी भिडणार आहे. भारताने गेल्या वर्षी टी-20 विश्वचषक जिंकला होता आणि आता त्यांचे लक्ष सलग दुसऱ्यांदा आयसीसी स्पर्धा जिंकण्यावर असेल.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ग्रुप स्टेज सामना झाला होता ज्यामध्ये भारतीय संघाने विजय मिळवला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ याच आत्मविश्वासाने मैदानात उतरेल.
न्यूझीलंड नेहमीच भारतासाठी कठीण आव्हान ठरले आहे आणि आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंडचा भारताविरुद्ध विजयाचा रेकॉर्ड 10-6 असा आहे.आयसीसीच्या बाद फेरीत न्यूझीलंडने भारताविरुद्ध चार पैकी तीन सामने जिंकले आहेत.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना रविवार, 9 मार्च रोजी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दुपारी 2:30 वाजता खेळला जाईल.टॉस त्याच्या अर्धा तास आधी, म्हणजे दुपारी 2:00 वाजता होईल.
भारतीय संघाचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, कुलदीप यादव/हर्शीत राणा.
Edited By - Priya Dixit