रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 9 जून 2024 (12:14 IST)

IND vs PAK : 596 दिवसांनंतर T20 मध्ये भारत-पाकिस्तान आमनेसामने, महामुकाबला आज

IND Vs PAK
T20 विश्वचषकाचा 19 वा सामना आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. T20 विश्वचषक 2024 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवार, 9 जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा अपेक्षित आहे.  सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता होणार आहे. नाणेफेक संध्याकाळी 7.30 वाजता होईल.
 
भारत आणि पाकिस्तान 596 दिवसांनी टी-20 फॉरमॅटमध्ये आमनेसामने येणार आहेत. 23 ऑक्टोबर 2022 रोजी या फॉरमॅटमध्ये दोन्ही संघांची शेवटची भेट झाली होती. T20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघाने मेलबर्नमध्ये खेळलेला हा सामना चार गडी राखून जिंकला होता. 
 
आशिया कप 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ दोनदा आमनेसामने आले होते, तर एकदा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत. भारताने दोन सामने जिंकले होते, तर आशिया कपमधील एक सामना अनिर्णित राहिला होता.
 
T20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानविरुद्ध उत्कृष्ट विक्रम आहे. 2007 पासून या स्पर्धेत दोन्ही संघ सात वेळा आमनेसामने आले आहेत.एकूण T20 मध्ये दोन्ही संघांमध्ये 12 सामने झाले आहेत. भारताने आठ वेळा तर पाकिस्तानने तीन वेळा विजय मिळवला आहे. 2007 मध्ये, एक सामना टाय झाला होता, जो टीम इंडियाने बाउल आउटमध्ये जिंकला होता. म्हणजेच टीम इंडियाने एकूण 12 पैकी नऊ जिंकले आहेत. 
 
T20 विश्वचषकातील पहिला सामना जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आज पाकिस्तानविरुद्ध बहुप्रतिक्षित सामना खेळणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या हायव्होल्टेज सामन्यासाठी केवळ दोन्ही संघ सज्ज नाहीत तर चाहत्यांमध्येही या सामन्याची उत्सुकता आहे, या टी-20 सामन्यात न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ भिडतील. 596 दिवस एकमेकांना सामोरे जाईल
स्पर्धेच्या सुरुवातीला ISIS कडून मिळालेल्या दहशतवादी धमकीनंतर, सामन्यासाठी विस्तृत सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नासाऊ काउंटीचे पोलिस आयुक्त पॅट्रिक रायडर यांनी नुकतीच सुरक्षा व्यवस्थेची माहिती दिली. 
 
दोन्ही संघ-
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
 
पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर, हरीस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सॅम अयुब, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान .
 
Edited by - Priya Dixit