शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 9 जानेवारी 2022 (13:48 IST)

IND vs SA 3rd Test: विराट कोहली केपटाऊनमध्ये स्टीव्ह वॉ आणि राहुल द्रविडचा विक्रम मोडू शकतात

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अंतिम सामना 11 जानेवारीपासून केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ केपटाऊनमध्ये पोहोचले आहेत. कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. सेंच्युरियनमधील पहिली कसोटी भारताने 113 धावांनी जिंकली, तर जोहान्सबर्ग येथील दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेकडून 7 गडी राखून पराभव झाला. दुसऱ्या कसोटीत संघाला कर्णधार विराट कोहलीची उणीव भासली, जो पाठीच्या दुखण्यामुळे प्लेइंग इलेव्हनचा भाग होऊ शकले नाही. विराट आता तिसऱ्या कसोटीत पुनरागमन करणार असून त्याच्यासमोर अनेक विक्रम लक्ष्यावर असतील.  
भारताकडून दक्षिण आफ्रिकेत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कोहली सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. जर त्यांनी आणखी 14 धावा केल्या तर ते  राहुल द्रविडचा विक्रम मोडतील आणि या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचतील. कोहलीने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेतील सहा कसोटी सामन्यांमध्ये 50.91 च्या सरासरीने 611 धावा केल्या आहेत. यादरम्यान कोहलीच्या बॅटमधून 2 शतके आणि 2 अर्धशतके झळकली आहेत. टीम इंडियाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने दक्षिण आफ्रिकेत 11 कसोटी सामन्यात 29.71 च्या सरासरीने 624 धावा केल्या आहेत. यादरम्यान द्रविडने एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली. द्रविडच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेत पहिला कसोटी विजय मिळवला होता. दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर अव्वल स्थानावर आहे. तेंडुलकरने 15 कसोटी सामन्यांमध्ये 46.44 च्या सरासरीने 1161 धावा केल्या ज्यात तीन शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
भारतीय कसोटी कर्णधार कोहलीला दक्षिण आफ्रिकेत आणखी एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे. कसोटीत 8000 धावा पूर्ण करण्यापासून ते  केवळ 146 धावा दूर आहे. कोहलीने आतापर्यंत 98 कसोटी सामन्यांच्या 166 डावांमध्ये 51 च्या सरासरीने 7854 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 27 शतके आणि 27 अर्धशतकेही केली आहेत.
भारतीय कसोटी कर्णधार कोहलीने कर्णधार म्हणून आतापर्यंत 40 कसोटी सामने जिंकले आहेत. कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी जिंकण्याच्या बाबतीत ते ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉला मागे टाकू शकतात . वॉने 57 पैकी 41 कसोटी सामने जिंकले. त्याचबरोबर कोहलीने 67 पैकी 40 कसोटी सामने जिंकले आहेत. वॉ चा विक्रम मोडण्यापासून ते फक्त एक विजय दूर आहे.