गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 4 ऑगस्ट 2024 (11:54 IST)

IND vs SL:भारत-श्रीलंका दुसरा एकदिवसीय सामना आज, प्लेइंग 11 जाणून घ्या

भारत आणि श्रीलंका यांच्यातील सध्या सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना आज खेळवला जाणार आहे. पहिला सामना बरोबरीत सुटला होता. आता दुसऱ्या सामन्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. या सामन्यातून दोन्ही संघ मालिकेत आघाडी घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना होणार आहे. 

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. पहिला सामना 230 धावांच्या लक्ष्यावर टाय झाला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने भारताला 231 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघ 230 धावांवर सर्वबाद झाला. 
 
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज, रविवार, 4 ऑगस्ट रोजी आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सुरू होईल. सामन्यासाठी नाणेफेक अर्धा तास आधी होईल.दुसऱ्या वनडेत भारताच्या प्लेइंग 11 मध्ये बदल होऊ शकतो, 
 
दोन्ही संघातील संभाव्य प्लेइंग 11
भारत:  शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रायन पराग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.
 
श्रीलंका:  चरित असलंका (कर्णधार), पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, निशान मदुष्का, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेलालगे, चमिका करुणारत्ने, महिश टीक्षाना, दिलशान मदुशंका, मथिशा पाथिराना.
 Edited by - Priya Dixit