रविवार, 8 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 3 ऑगस्ट 2024 (16:09 IST)

Rohit Sharma :रोहित शर्मा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा कर्णधार बनला

रोहित शर्माने आज श्रीलंकेविरुद्ध आणखी एक नवा विक्रम रचला. T20 वर्ल्ड कप 2024 च्या फायनलमध्ये विजय मिळवल्यानंतर हिटमॅन रोहित शर्माचा हा पहिलाच सामना आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळताना रोहित शर्माने असा विक्रम रचला आहे. कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा तो जगातील पहिला कर्णधार ठरला आहे. 
 
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून रोहित शर्मा आता सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. त्याने इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गनचा विक्रम मोडीत काढला. आज कोलंबोमध्ये खेळल्या जात असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहितने तिसरा षटकार ठोकताना ही कामगिरी केली.
रोहित शर्माच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 59 सामने खेळल्यानंतर आतापर्यंत एकूण 84 षटकार मारले आहेत. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 262 सामने खेळले असून 323 षटकार मारले आहेत. T20 इंटरनॅशनलबद्दल बोलायचे झाले तर हिटमॅनने 159 मॅचमध्ये 205 सिक्स मारले आहेत. मात्र, कर्णधार म्हणून नव्हे तर खेळाडू म्हणून हे त्याचे विक्रम आहेत. रोहित शर्माने आता T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, परंतु तो पुढील काही वर्षे एकदिवसीय आणि कसोटी खेळताना दिसणार आहे
Edited by - Priya Dixit