शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 27 जुलै 2021 (16:32 IST)

IND vs SL: कोरोना पॉझिटिव्ह निघाला क्रुणाल पांड्या

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह ठरला आहे, त्यामुळे मंगळवारी भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी -२० सामना पुढे ढकलण्यात आला आहे. सध्या भारतातील सर्व खेळाडू आइसोलेशनमध्ये असून प्रत्येकाची टेस्ट नेगेटिव झाल्यास बुधवारी दुसरा टी -२० सामना खेळला जाईल. तथापि, बीसीसीआयने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.