शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 6 फेब्रुवारी 2022 (16:06 IST)

Ind vs WI 1st ODI:वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी काळी पट्टी बांधून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय खेळाडू हातात काळी पट्टी बांधून मैदानात उतरले. याद्वारे भारतीय संघातील सर्व खेळाडूंनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचे रविवारी वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. कोविड-19 आणि न्यूमोनियामुळे 8 जानेवारी रोजी त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तथापि, कोविडमधून बरे झाल्यानंतर शनिवारी गायिकेची प्रकृती बिघडली आणि त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, " भारतीय खेळाडू लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये काळी पट्टी बांधतील. राष्ट्रध्वज अर्ध्यावर राहील.
लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ दोन दिवसांचा राष्ट्रीय शोक पाळण्यात येणार आहे. राष्ट्रध्वजही दोन दिवस अर्धा झुकलेला राहणार आहे.