सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 7 ऑगस्ट 2022 (10:48 IST)

IND vs WI 4th T20: चौथ्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 59 धावांनी पराभव केला

चौथ्या T20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 59 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. मालिकेतील शेवटचा सामना 7 ऑगस्ट रोजी होणार आहे.
 
भारतीय क्रिकेट संघाने पाच T20 सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजचा पराभव केला. अमेरिकेतील फ्लोरिडा येथे शनिवारी (6 ऑगस्ट) खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात त्याने 59 धावांनी विजय मिळवला. अशाप्रकारे संघाने मालिकेत ३-१ अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना रविवारी (७ ऑगस्ट) या मैदानावर खेळवला जाणार आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 5 बाद 191 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा डाव 19.1 षटकांत 132 धावांवर आटोपला. भारताकडून ऋषभ पंतने 44 धावा केल्या. त्याचबरोबर अर्शदीप सिंगने गोलंदाजीत सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.