1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 5 जून 2024 (20:28 IST)

T20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा आयर्लंड विरुद्ध सामन्यात टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय

India vs ireland
आज भारतीय संघ टी20 विश्वचषक 2024 मध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. त्याचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध आहे. हा ग्रुप-अ सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यासंदर्भात न्यूयॉर्कमध्येही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
 
पुरुषांच्या ट्वेन्टी20 विश्वचषकात भारत आणि आयर्लंडमधला सामना आज न्यूयॉर्कमध्ये खेळवला जातो आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.
 
आजवर आयर्लंडविरुद्धच्या सर्व ट्वेन्टी20 सामन्यांमध्ये भारतानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. भारतानं सातपैकी सातही सामन्यांत आयर्लंडला हरवलं होतं.
 
आजच्या लढतीतही साहजिकच अनुभवी टीम इंडियाचं पारडं जड आहे. पण म्हणून आयर्लंडला कमी लेखण्याची चूकही करून चालणार नाही.
ग्रुप ‘ए’ मधला हा सामना न्यूयॉर्कच्या नासॉ कौंटीतील नव्या तात्पुरत्या स्टेडियमवर खेळवला जाईल.
 
याआधी न्यूयॉर्कच्या याच मैदानावर झालेल्या सराव सामन्यात भारतानं बांगलादेशला 60 रन्सनी हरवलं होतं. दोन्ही संघांनी तेव्हा चांगल्या धावा केल्या. पण मग दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात फलंदाज धावांसाठी संघर्ष करताना दिसले.
 
त्यामुळे या मैदानाचा अंदाज लागणं कठीण असल्याचं काही क्रिकेट तज्ज्ञांना वाटतं.हार्दिक पांड्या फॉर्ममध्ये असणे टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचे असेल.
 
पंड्या हा संघाला भरपूर समतोल प्रदान करणारा खेळाडू आहे. त्याचबरोबर जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव हे देखील भारतासाठी एक्स फॅक्टर ठरू शकतात
 
आयसीसी विजेतेपदाची प्रतीक्षा
2007 साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतानं पहिलावहिला ट्वेन्टी20 विश्वचषक जिंकला होता. पण त्यानंतर 17 वर्षांत ही ट्रॉफी पुन्हा जिंकण्याचा योग टीम इंडियाला साधता आलेला नाही.
 
11 वर्ष, 9 स्पर्धा आणि एकही विजेतेपद नाही. भारताच्या पुरुष क्रिकेट टीमची 2013 नंतरची आयसीसी स्पर्धांमधली ही कामगिरी आहे.
भारतीय संघ 2023 मध्ये विजेतेपदाच्या जवळ आला होता.
 
मायदेशात झालेल्या त्या स्पर्धेत टीम इंडियानं वर्चस्व गाजवलं, पण फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून टीमला पराभव स्वीकारावा लागला. आता सहा-सात महिन्यांनी पुन्हा एकदा भारतीय संघ आयसीसी विजेतेपदासाठी प्रयत्न करतो आहे.
 
ही स्पर्धा म्हणजे प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडची अखेरची मोठी स्पर्धा आहे. आपण पुन्हा प्रशिक्षकपदासाठी अर्ज करत नसल्याचं द्रविडनं स्पष्ट केलं आहे.
 
2013 सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडियाला वर्ल्ड कपचं विजेतेपद मिळालेलं नाही.
 
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा, विराट कोली, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमरा, अर्शदीप

Edited by - Priya Dixit