शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 14 डिसेंबर 2021 (11:13 IST)

IND vs SA: विराट कोहलीने एकदिवसीय मालिकेतून माघार घेतली, बीसीसीआयला सांगितले 'उपलब्ध नाही'!

भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA)यांच्यातील मालिका २६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वीच अनेक घडामोडी समोर येत आहेत. ताज्या माहितीनुसार, एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आल्यानंतर विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. विराट कोहली दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार्‍या कसोटी संघाचा भाग आहे आणि तो त्याचा कर्णधार देखील आहे, परंतु त्याने आधीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) सांगितले आहे की तो एकदिवसीय संघात खेळणार नाही.
 
भारत आणि दक्षिण आफ्रिका (भारत वि दक्षिण आफ्रिका)मालिकेपूर्वी, मर्यादित षटकांच्या दोन्ही फॉरमॅटमध्ये रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवण्याच्या बीसीसीआयच्या नुकत्याच झालेल्या निर्णयानंतर बरीच चर्चा होत आहे. जरी,विराट कोहलीया प्रकरणी स्वत: अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. असे म्हटले जात आहे की दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका वगळण्याच्या त्याच्या निर्णयाचा कर्णधार बदलाशी काहीही संबंध नाही.
 
वामिकाच्या वाढदिवसाला विराट प्लॅन करत आहे व्हेकेशन!
वृत्तानुसार, विराटला आपल्या मुली (वामिका)चा पहिला वाढदिवस साजरा करायला वेळ हवा आहे. वामिकाचा जन्म गेल्या वर्षी 11 जानेवारी रोजी झाला होता आणि भारतीय कसोटी कर्णधार कसोटी मालिका संपल्यानंतर आपल्या कुटुंबासोबत सुट्टी घालवण्याचे नियोजन करत असल्याचे सांगितले जाते. या दौऱ्यातील अंतिम कसोटी 11 ते 15 जानेवारी दरम्यान खेळवली जाणार आहे. एकदिवसीय मालिका 19 जानेवारीपासून सुरू होणार आहे.