Virat Kohliच्या मुलीला बलात्काराची धमकी देणारा सॉफ्टवेअर इंजिनिअर निघाला, पोलिसांनी हैदराबादमधून अटक केली  
					
										
                                       
                  
				  				  
				   
                  				  भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीची मुलगी वामिकाला काही दिवसांपूर्वी बलात्काराच्या धमक्या आल्या होत्या. याप्रकरणी कारवाई करत मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने हैदराबाद येथून एका व्यक्तीला अटक केली आहे. रामनागेश श्रीनिवास अकुबथिनी असे आरोपीचे नाव असून तो २३ वर्षांचा आहे. रामनागेश श्रीनिवास अकुबथिनी हा व्यवसायाने अन्न वितरण अॅप्ससाठी सॉफ्टवेअरमध्ये काम करतो. 
				  													
						
																							
									  
	 
	टी-20 विश्वचषकातील सलामीचा सामना हरल्यानंतर विराट कोहलीसह त्याच्या कुटुंबाला लक्ष्य करण्यात आले होते. दरम्यान, त्यांच्या 10 महिन्यांच्या मुलीलाही धमक्या देण्यात आल्या होत्या. यामुळे अनुष्का शर्मा चांगलीच संतापली होती. आपल्या मुलीसाठीच्या कमेंट्स वाचून मन तुटल्याचं तिने  म्हटलं होतं. इतर आईप्रमाणे ती खूप रागावलेली आहे.
				  				  
	 
	पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकनेही हे लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. इंझमाम म्हणाले की, लोकांना भारतीय खेळाडू आणि संघाच्या कामगिरीवर टीका करण्याचा अधिकार आहे, परंतु खेळाडूंच्या कुटुंबाला चांगले-वाईट म्हणणे लज्जास्पद आहे. त्यांचे कुटुंब या खेळाशी जोडलेले नाही, खेळाडू जोडलेले आहेत.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	इंझमामने त्याच्या यूट्यूब चॅनलवर भारतीय संघाच्या खेळाचा आढावा घेण्यासोबतच हा मुद्दा उपस्थित केला होता. हा खेळ आहे आणि त्यात जिंकण्याबरोबरच पराभवही आहे आणि सर्व संघांना त्याची चव चाखायची आहे, हे लोकांनी समजून घेतले पाहिजे, असे तो म्हणाला.