सोमवार, 1 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (19:33 IST)

विराट कोहली-रवी शास्त्री जोडीचा आज शेवटचा T20 सामना

virat-kohli-ravi-shastri-last-t20-match-today-know-how-the-atmosphere-of-the-dressing-room
विराट कोहली - रवी शास्त्री : UAE मध्ये खेळल्या जाणाऱ्या T20 विश्वचषकात सोमवारी भारताचा सामना नामिबियाशी होणार आहे. या विश्वचषकात भारताचा हा शेवटचा सामना आहे, कारण संघ आधीच उपांत्य फेरीतून बाहेर पडला आहे. यासोबतच कर्णधार आणि प्रशिक्षक म्हणून विराट कोहली आणि रवी शास्त्री या जोडीचाही हा शेवटचा सामना आहे. रवी शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपत असतानाच विराट कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. अशा स्थितीत टीम इंडियाला शास्त्री-कोहली युगाचा शेवट विजयाने करतील अशी अपेक्षा आहे.