बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 7 नोव्हेंबर 2021 (14:04 IST)

AFG vs NZ T20: अफगाणिस्तान-न्यूझीलंड सामना आज होणार, दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन अशी असेल

टी-20 वर्ल्ड कपमध्ये आज अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सामना रंगणार आहे. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी किवी संघाला हा सामना जिंकणे आवश्यक आहे. अफगाणिस्तानने हा सामना जिंकला तर भारताचा संघ उपांत्य फेरीत पोहोचेल. 
 
संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये खेळल्या जात असलेल्या ICC T20 विश्वचषकाचा 40 वा सामना आज अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना किवी संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के करण्यासाठी त्यांना कोणत्याही किंमतीवर विजय मिळवावा लागेल. त्याचबरोबर अफगाणिस्तान या सामन्यात उलटफेर करून भारताचा उपांत्य फेरीतील मार्ग सोपा करू शकतो. कारण अफगाणिस्तानचा विजय भारताच्या हितासाठी अधिक योग्य आहे. दोन्ही देशांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या या सामन्यामुळे उपांत्य फेरी गाठणारा चौथा संघ कोण असेल हे स्पष्ट होईल. पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे तीन संघ यापूर्वीच T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. अशा परिस्थितीत,  दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनबद्दल जाणून घ्या .
 
या विश्वचषकात आतापर्यंत न्यूझीलंडने ज्याप्रकारे कामगिरी केली आहे, त्यावरून किवी संघ उत्कृष्ट खेळत आहे, असे म्हणता येईल. मात्र, अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत एकही T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला नाही. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ असेल. दुसरीकडे, किवींनी त्यांच्या विश्वचषक मोहिमेतील केवळ एक सामना गमावला आहे आणि तीन विजयांसह उपांत्य फेरी गाठण्याच्या मार्गावर आहे. अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांना फक्त अफगाणिस्तानवर विजय मिळवण्याची गरज आहे. तर त्यांच्या शेवटच्या विश्वचषक सामन्यात अफगाणिस्तान किवींचा खेळ खराब करू शकतो. या सामन्यात अफगाणिस्तानचा संघ जिंकला तर भारताला उपांत्य फेरीचे तिकीट मिळेल. कारण टीम इंडियाचा नेट रन रेट न्यूझीलंडपेक्षा चांगला आहे. 
 
या सामन्यात न्यूझीलंडशी टक्कर देऊ शकणार्‍या खेळाडूंवर या खेळाडूंवर लक्ष ठेवण्यात येणार असून, त्यात मोहम्मद नबी, मोहम्मद शहजाद, राशीद खान, मुजीब उर रहमान आणि हजरतुल्ला झाझाई यांचा समावेश आहे. त्याचबरोबर मार्टिन गुप्टिल, केन विल्यमसन, डॅरेल मिशेल, डेव्हॉन कॉनवे आणि ट्रेंट बोल्ट या किवी संघातील खेळाडूंना सावधगिरी बाळगावी लागेल. 
 
संभाव्य प्लेइंग इलेव्हन
 न्यूझीलंड - मार्टिन गुप्टिल, डॅरेल मिशेल, केन विल्यमसन (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, अॅडम मिल्ने, टीम साऊदी , ईश सोढी, ट्रेंट बोल्ट. 
 
अफगाणिस्तान- हजरतुल्ला झाझाई, मोहम्मद शहजाद, रहमानउल्ला गुरबाज, गुलबदीन नायब, नजीबुल्ला जादरान, मोहम्मद नबी, करीम जनात, राशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन उल हक, हमीद हसन.