शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 1 नोव्हेंबर 2021 (12:25 IST)

T20 World Cup: इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने अंदाज वर्तवला , या दोन संघांमध्येच होणार फायनल

इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने 2021 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोन संघ खेळण्याची शक्यता वर्तवली आहे. दुबईत 14 नोव्हेंबरला होणारा अंतिम सामना इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तान 2009 च्या T20 विश्वचषकाचा चॅम्पियन ठरला आहे. T20 विश्वचषकात पाकिस्तानच्या सलग तिसऱ्या विजयानंतर स्टोक्सचा अंदाज आला आहे. पाकिस्तानने शुक्रवारी अफगाणिस्तानवर 5 गडी राखून मात केली.
 
यापूर्वी 24 ऑक्टोबर रोजी दुबईत पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता. यानंतर त्याने आपल्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा 5 गडी राखून पराभव केला. तीन विजयांसह, ते त्यांच्या गटातील अव्वल संघ राहिले आणि त्यांच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याची शक्यता खूप जास्त आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान सामना संपल्यानंतर स्टोक्सने ट्विट केले, "इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान फायनल?' इंग्लंडबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी या स्पर्धेत सलग दोन विजयांची नोंद केली आहे.
 
इंग्लंडने आपल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजला 55 धावांत गुंडाळले होते. यानंतर इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचा 8 गडी राखून पराभव केला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शनिवारी सामना रंगणार आहे. स्टोक्सने मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ब्रेक घेतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी अॅशेस मालिकेत तो खेळताना दिसणार आहे.