मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (23:54 IST)

T20 WORLD CUP IND VS NAM: टीम इंडियाने कर्णधार विराट कोहलीला दिला शानदार फेअरवेल

दुबईतील दुबई क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि नामिबिया यांच्यात T20 वर्ल्डचा 42 वा सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने नामिबियाचा 9 गडी राखून पराभव केला. टीम इंडियाने 133 धावांचे लक्ष्य 15.2 षटकात 1 गडी गमावून पूर्ण केले. भारताकडून रोहित शर्माने 56 आणि केएल राहुलने नाबाद 54 धावा केल्या. तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना नामिबियाने निर्धारित 20 षटकांत 8 गडी गमावून 132 धावा केल्या. नामिबियाकडून डेव्हिड वेसने 26 धावा केल्या. भारताकडून रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी 3 बळी घेतले.