संबंधित माहिती
- ICC Rankings: हरमनप्रीत कौरने चार स्थानांची झेप घेतली, टॉप 5 मध्ये शामिल
- IND W vs ENG W: भारतीय क्रिकेटला झुलनची उणीव भासेल, कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली
- IND vs PAK Asia Cup: आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्या संदर्भात प्रसिद्ध प्रोमो व्हिडिओ मध्ये रोहित आणि बाबर
- Commonwealth Games 2022: टीम इंडियासमोर काय आव्हान असणार ? पाकिस्तानशीही स्पर्धा होईल, वेळापत्रक आणि सर्वकाही जाणून घ्या
- हरमनप्रीत आणि मंधानाची श्रीलंकेविरुद्धच्या दमदार कामगिरीमुळे क्रमवारीत सुधारणा
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने केली जबरदस्त कामगिरी, ICC ने दिली मोठी भेट!
इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली. या मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला खेळाडूंना आयसीसी क्रमवारीतही फायदा झाला आहे. या मालिकेत 221 धावा करणाऱ्या भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने फलंदाजांच्या क्रमवारीत चार स्थानांनी प्रगती करत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याचवेळी स्मृती मानधना एका स्थानाच्या फायद्यासह सहाव्या स्थानावर पोहोचली आहे.
रेणुका सिंगला 35 स्थानांचा फायदा झाला आहे. महिला गोलंदाजांच्या वनडे क्रमवारीत ती 35 व्या स्थानावर पोहोचली आहे. त्याचवेळी झुलन गोस्वामीने पाचवे स्थान मिळवून करिअर पूर्ण केले. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत वेस्ट इंडिजची कर्णधार हेली मॅथ्यूजने अष्टपैलू कामगिरी केली होती. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत ती प्रथम आली आहे. त्यांना तीन स्थानांचा फायदा झाला.
Edited by : Smita Joshi
