सोमवार, 14 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 9 ऑगस्ट 2022 (20:02 IST)

IND vs PAK Asia Cup: आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्या संदर्भात प्रसिद्ध प्रोमो व्हिडिओ मध्ये रोहित आणि बाबर

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप टी-20 सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. भारत आणि पाकिस्तान 28 ऑगस्टला आमनेसामने येणार आहेत. 28 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. यासाठी स्टार स्पोर्ट्सने एक प्रोमो व्हिडिओही जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम दिसत आहेत. 
 
प्रोमो व्हिडिओमध्ये रोहित शर्मा फलंदाजी करताना दिसत आहे. पार्श्वभूमीत रोहित शर्माचा आवाज ऐकू येतो. तसेच लोक आवाज करत आहेत. यामध्ये रोहित म्हणतो - आमच्यामध्ये एक रेषा आहे, जी क्रीजपर्यंत ओढली आहे.