1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 3 ऑगस्ट 2020 (11:58 IST)

आयपीएलचा तेरावा हंगाम भरणार, भारतीय खेळाडूंना युएई प्रवासाची परवानगी

indian government
आयपीएलचा तेरावा हंगाम भरवण्यासाठी  केंद्र सरकारने भारतीय खेळाडूंना युएई प्रवासाची परवानगी दिली असून १९ सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मात्र स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून नवीन वेळापत्रकानुसार अंतिम सामना १० नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. याचसोबत सर्व सामने हे 
रात्री साडे सात वाजता सुरु होणार असल्याचं कळतंय.
 
तेराव्या हंगामाच्या आयोजनाबद्दल रविवारी गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक आयोजित करण्यात आली होती. याआधी तेराव्या हंगामाचा अंतिम सामना हा ८ नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार होता. परंतू करोनामुळे तयार करण्यात आलेले नवीन नियम, भारतीय संघाचा आगामी ऑस्ट्रेलिया दौरा आणि दोन सामन्यांमध्ये खेळाडूंना पुरेसा वेळ मिळाला यासाठी स्पर्धेच्या अंतिम सामन्याची तारीख बदलून ८ ऐवजी १० करण्यात आल्याचं कळतंय. याचसोबत सध्याच्या हंगामासाठी VIVO हीच कंपनी स्पर्धेची मुख्य स्पॉन्सर राहणार असल्याचं निश्चीत झालंय.