गुरूवार, 24 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified शनिवार, 23 जानेवारी 2021 (09:41 IST)

आयपीएल 2021 : 18 फेब्रुवारीला खेळाडूंचा लिलाव होण्याची शक्यता

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 च्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव 18 फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या एका अधिकार्याने ही माहिती दिली. तो म्हणाला की, लिलाव 18 फेब्रुवारीला होऊ शकतो, मात्र कोणत्या ठिकाणी याबाबतचा निर्णय अद्याप झाला नसल्याने त्याने सांगितले.
 
शिवाय बीसीसीआयला अद्यापही आगामी आयपीएलचे आयोजन भारतात करायचे की नाही याबाबतचाही निर्णय घ्यावा लागणार आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी प्रत्येकवेळी आयपीएलच्या घरच्या मैदानावर करण्यासाठी श्क्य ते सर्व प्रयत्न केले जातील, असे वारंवार सांगितले आहे. कोरोना महामारीमुळे आयपीएलचा तेरावा हंगाम संयुक्त अरब अमिरातमध्ये पार पडला होता. जगातील सर्वात आवडत्या क्रिकेटलीगच्या म्हणजे आयपीएलच्या तयारीला प्रारंभ झाला आहे. बुधवारपासून अधिकृतरीत्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाली आहे. 14 व्या हंगामासाठी लिलावापूर्वी सर्व संघांनी आपल्या अनेक खेळाडूंना रिलीज आणि रिटेन केले आहे.