1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 सप्टेंबर 2023 (21:19 IST)

जसप्रीत बूमराहला झाले 'पुत्ररत्न', मुलाला दिले 'हे' नाव

bumrah
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. बुमराहची पत्नी संजना गणेशन हिने  मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्माने झालेला आंनद बुमराहने सर्वांसोबत शेअर केला आहे. संजना आणि जसप्रीत नुकतेच पालक झाले असून सोशल मीडियावर याबाबत आपल्या चाहत्यांना त्यांनी गुड न्यूज दिली आहे.
 
दरम्यान जसप्रीत बुमराह आणि संजनाने आपल्या मुलाचं नाव अंगद असं ठेवलं आहे. बुमराहने स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आहे. बाळाचा आणि पत्नीचा हात हातात घेऊन बुमराहने फोटो पोस्ट केला आहे. "आयुष्यातील या नव्या जबाबदारीबद्दल खुश आहे", असं त्याने पोस्टमध्ये लिहीलं आहे.जसप्रीत आणि संजनाच्या मुलाचं नाव अंगद आहे, बुमराहने इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरुन ही माहिती दिली.
 
टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या घरी ही आनंदाची बातमी आली आहे. त्याची पत्नी संजना गणेशन हिने सोमवारी (4 सप्टेंबर) मुलाला जन्म दिला आणि याच कारणास्तव बुमराहने आशिया कप-2023 क्रिकेट टूर्नामेंट मध्येच सोडली आणि तो श्रीलंकेतून मायदेशी परतला.  
 
बुमराहने शेअर केली खास पोस्ट
बुमराहने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला. या पोस्टमध्ये बुमराहने पत्नी आणि मुलाचा हात हातात घेतला आहे आणि त्याने लिहिलं की, "आमचं छोटे कुटुंब आता वाढलं आहे. आमचं हृदय भरुन आलं आहे. आज सकाळी आम्ही आमच्या छोट्या बाळाचं, अंगद जसप्रीत बुमराहचं या जगात स्वागत केलं, आम्ही खूप आनंदी आहोत आणि आमच्या आयुष्यातील नवीन अध्याय सुरू करण्याची आम्ही वाट पाहू शकत नाही.' बुमराहच्या या पोस्टवर चाहत्यांनी त्याचं अभिनंदन केलं आणि प्रेमाचा वर्षाव केला आहे.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor