शनिवार, 2 डिसेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 13 सप्टेंबर 2023 (23:07 IST)

Ben Stokes Record: निवृत्तीवरून परतल्यानंतर बेन स्टोक्सने रचला इतिहास, इंग्लंडसाठी सर्वात मोठी खेळी खेळली

Ben Stokes Record:इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. स्टोक्स हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज ठरला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्याने 124 चेंडूत 15 चौकार आणि नऊ षटकारांसह 182 धावा केल्या. मात्र, स्टोक्सला द्विशतक झळकावता आले नाही. इंग्लंडच्या डावातील 45व्या षटकात तो बाद झाला. बेन लिस्टरने त्याला विल यंगकरवी झेलबाद केले. स्टोक्सकडे द्विशतक झळकावण्याची उत्तम संधी होती, मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट गमावली.
 
स्टोक्स च्या आधी एकदिवसीय क्रिकेट मध्ये इंग्लंडसाठी सर्वात मोठी झालेली जेसन रॉय खेळले होते. रॉयने 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 151 चेंडूत 180 धावा केल्या होत्या. त्याच्या खेळीत 16 चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. 
 
बेन स्टोक्स ने 14 महिन्यांनंतर एक दिवशीय क्रिकेट मध्ये परतले आहे. आपल्या कामाचा बोजा सांभाळण्यासाठी त्याने गेल्या वर्षी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. तो कसोटीत इंग्लंड संघाचा कर्णधार आहे आणि टी-20 क्रिकेटही खेळतो. मात्र, इंग्लंडचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार जोस बटलर यांच्या आग्रहावरून स्टोक्सने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेद्वारे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. 
 
परत आल्यावर स्टोक्सने 52 धावा केल्या. आता या मालिकेत त्याने 182 धावांची शानदार खेळी केली आहे. तो फलंदाजीला आला तेव्हा इंग्लंडची धावसंख्या 13/2 होती. येथून त्याने डेव्हिड मलानसोबत 199 धावांची भागीदारी करून आपल्या संघाला सामन्यात परत आणले आणि तो बाद झाला तेव्हा इंग्लंडची धावसंख्या 348/6 होती. स्टोक्सच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने या सामन्यात 368 धावा केल्या. मात्र, इंग्लंड संघ पूर्ण 50 षटकेही खेळू शकला नाही आणि 11 चेंडू शिल्लक असताना इंग्लिश संघाचा डाव संपुष्टात आला.
 
 

Edited by - Priya Dixit