शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 3 जुलै 2023 (17:10 IST)

Ashes: अॅलेक्स कॅरीने बेअरस्टोला बाद केल्यावर वाद निर्माण

अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 43 धावांनी पराभव केला. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या या कसोटीत एक नाही तर तीन वाद झाले. स्टीव्ह स्मिथचा झेल, मिचेल स्टार्कच्या झेलनंतर जॉनी बेअरस्टोच्या रनआउटवर दोन्ही संघ आमनेसामने आले. लोक याला रनआऊट म्हणत असले तरी अंपायरने बेअरस्टोला स्टंप आऊट घोषित केले. या प्रकरणावरुन गदारोळ झाला. जागतिक क्रिकेटमधील दिग्गजांनीही आपले मत मांडले. काहींनी क्रिकेटच्या नियमांनुसार अॅलेक्स कॅरीने केलेला स्टंप हा खेळाच्या भावनेच्या विरोधात असल्याचे मानले.
 
सामन्याच्या पाचव्या दिवशी इंग्लॅन्ड संघ लक्षाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आली. आणि कर्णधार बेन स्टोक्स ने बेन डकेट यांच्यासह भागीदारी करत संघाचे पुनरागमन केले. डकेट बाद झाल्यावर जॉनी बेअरस्टो आणि स्टोक्स यांनी भागेदारी केली, मात्र बेअरस्टो हे यष्टीचीत झाले. बेअरस्टोने इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील 52 व्या षटकातील शेवटचा चेंडू सोडला आणि स्टोक्सशी बोलण्यासाठी क्रीजच्या बाहेर आला. हे पाहून यष्टिरक्षक कॅरीने चेंडू झेलला आणि त्याची विकेट घेतली. नियमानुसार, चेंडू डेड नव्हता आणि ऑस्ट्रेलियाच्या अपीलवर, पंचांनी बेअरस्टोला बाद घोषित केले. 
 
बेअरस्टोला बाद  दिल्यानंतर त्याचे अनेक व्हिडिओ समोर आले. बेअरस्टो धावत्या चेंडूवर वारंवार क्रीज सोडत असल्याचे या व्हिडिओंमध्ये स्पष्टपणे दिसत होते. त्याचा फायदा घेत ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी त्याची विकेट घेतली. यावर कितीही वाद झाला तरी त्याची विकेट जाण्यासाठी बेअरस्टो जबाबदार होता हे स्पष्टपणे सांगितले.  
 
बेअरस्टोला अशाप्रकारे बाद केल्यानंतर गदारोळ होणे निश्चितच होते. मैदानाबाहेर बसलेल्या इंग्लंडच्या चाहत्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
 
Edited by - Priya Dixit