गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 13 डिसेंबर 2022 (20:13 IST)

Joe Root Record:जो रूट जॅक कॅलिस आणि स्टीव्ह वॉच्या विशेष क्लबमध्ये सामील होऊन सचिन तेंडुलकर ला मागे टाकले

इंग्लंडचा स्टार खेळाडू जो रूट हा त्याच्या कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजीसाठी ओळखला जातो, मात्र पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने तीन बळी घेत चेंडूने महत्त्वपूर्ण योगदान दिले. यासह, तो जगातील महान अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत सामील झाला. रुट हा जगातील तिसरा खेळाडू आहे ज्याने कसोटीत 10,000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत आणि 50 बळीही घेतले आहेत. त्याच्या आधी फक्त जॅक कॅलिस आणि स्टीव्ह वॉ हेच करू शकले होते. 
 
जो रूटने या यादीत भारताचा दिग्गज सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. सचिनने कसोटीत 46 विकेट घेतल्या आहेत, तर रुटने 50 विकेट घेतल्या आहेत. सचिनने कसोटीत 15921 धावा केल्या. या बाबतीत रुट सचिनच्या मागे आहे, पण विकेट घेण्याच्या बाबतीत रुटने सचिनला मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाचा ऍलन बॉर्डर या यादीत पाचव्या स्थानावर आहे, त्याने 11174 धावा केल्या आणि 39 बळी घेतले. 

Edited by - Priya Dixit