शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 15 जून 2022 (16:15 IST)

जो रूट आयसीसी कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियन दिग्गजांना मागे टाकून जगातील नंबर वन फलंदाज बनला

ICC Test Rankings :आयसीसी कसोटी क्रमवारीत इंग्लंडचा फलंदाज जो रूट पुन्हा एकदा चमकला आहे.सलग दोन सामन्यांत दोन शतके झळकावणारा जो रूट पुन्हा कसोटी क्रिकेटमधील नंबर वन फलंदाज बनला आहे.जो रूटने ऑस्ट्रेलियन दिग्गज मार्नस लॅबुशेनला मागे टाकत पुन्हा नंबर वनची खुर्ची मिळवली आहे.जो रुट हे यापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकाचा फलंदाज होते आणि ते बराच काळ टॉप 10 मध्ये राहिले आहे.
 
न्यूझीलंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात जो रूटने शतक झळकावले.या जोरावर तो आधी दुसरा आणि नंतर पहिला क्रमांक गाठला.जो रूटच्या खात्यात सध्या 897 रेटिंग पॉईंट्स आहेत, तर मार्नस लाबुशेनच्या खात्यात 892 गुण आहेत.तिसर्‍या क्रमांकावर स्टीव्ह स्मिथ आहे, त्याच्या खात्यात 845 गुण आहेत.बाबर आझम815 गुणांसह चौथ्या आणि केन विल्यमसन798 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. 
 
आयसीसी कसोटी क्रमवारीत गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर पॅट कमिन्स 901 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर आर अश्विन 850 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.जसप्रीत बुमराह 830 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.त्याच्या खालोखाल शाहीन आफ्रिदीच्या खात्यात 827 गुण आहेत आणि कागिसो रबाडा 818 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. 
 
अष्टपैलू खेळाडूंच्या कसोटी क्रमवारीत रवींद्र जडेजा 385 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे आणि रविचंद्रन अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यांच्या खात्यात 341 गुण आहेत.तिसऱ्या क्रमांकावर जेसन होल्डर असून त्याच्या खात्यात 336 गुण आहेत आणि शाकिब अल हसन 327 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.पाचव्या क्रमांकावर इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स आहे, त्याच्या खात्यात 307 गुण आहेत.