रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 27 मार्च 2023 (21:43 IST)

केदार जाधव याचे वडील महादेव जाधव हे पुण्यातून बेपत्ता

क्रिकेट संघातील खेळाडू केदार जाधव याचे वडील महादेव जाधव हे पुण्यातून बेपत्ता झाले आहेत. पुणे पोलिसांत ते हरवल्याची तक्रार दाखल झाली आहे. जाधव कुटुंबियांनी ही तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, केदार जाधव याचे वडील महादेव जाधव हे पुण्यातून बेपत्ता झाले आहेत. पुण्यातील कोथरूड भागातून आज सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास ते घराबाहेर पडले ते अद्याप परतलेले नाहीत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, केदार जाधव याचे कुटुंबीय कोथरूड भागात राहतात. महादेव जाधव हे सोमवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास रिक्षा घेऊन गेले मात्र आत्तापर्यंत त्यांचा काहीच शोध लागलेला नाही. त्यांच्याजवळ असलेला मोबाईल फोनही बंद लागत आहे. त्यांचा काहीच संपर्क होऊ न शकल्यानं कुटुंबियांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor