1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
  4. Kumar Sangakkara, sri lanka, 19 thousand, cricket news

संगकाराचा 19 हजारचा टप्पा पूर्ण

लंडन- श्रीलंकेच्या कुमार संगकराने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 19 हजार धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील चौथा क्रिकेटपटू ठरला. ग्रॅहॅम गूच, ग्रॅमी हिक आणि सचिन तेंडुलकर यांनी ही कामगिरी केली आहे.
 
संगकारा इंग्लिश कौंटीमध्ये सरेकडून खेळत आहे. स्थानिक वनडे स्पर्धेत त्याने ग्लॅमॉर्गनविरूद्ध 81 धावांची खेळी केली. त्यामुळे सरेला आठ विकेट राखून विजय मिळाला. संगकारा 39 वर्षांचा आहे. 2015 मध्ये तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला.
 
सरेकडून त्याने प्रथमश्रेणी आणि वनडे सामन्यांत सहा डावांत 94.20 च्या सरासरीने 471 धावा केल्या आहेत. कौंटीत त्याने सलग दोन शतके काढली.
पुढील लेख
पाकिस्तानला प्रत्युत्तर देणारच: लष्करप्रमुखांचा इशारा