1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Army Chief Bipin Rawat, Krishna Ghati

पाकिस्तानला प्रत्युत्तर देणारच: लष्करप्रमुखांचा इशारा

पाकिस्तानी सैनिकांनी कृष्णा घाटीत भारतीय चौक्यांवर हल्ले करून त्यात शहीद झालेल्या जवानांच्या मृतदेहांची विटंबना केली होती. शत्रूंच्या या अमानवी कृत्याला सडेतोड उत्तर देऊ, असा थेट इशारा भारतीय लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दिला आहे. मात्र, पाकविरोधातील संभाव्य कारवाईबाबत सविस्तर माहिती देण्यात नकार दिला आहे.
 
कृष्णा घाटीतील घटनेनंतर जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी सुरक्षा दलांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती लष्करप्रमुख रावत यांनी दिली.
पुढील लेख
संगकाराचा 19 हजारचा टप्पा पूर्ण