शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: डेहराडून , मंगळवार, 14 एप्रिल 2020 (20:37 IST)

बीसीसीआयच्या उपाध्यक्षांचा राजीनामा; लॉकडाउननंतर होणार निर्णय

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष महिम वर्मा यांनी राजीनामा दिला आहे. महिम हे क्रिकेट असोसिएशन ऑफ उत्तराखंडचे सचिव आहेत. महिम यांच्या राजीनाम्यावर लॉकडाउन झाल्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे.
 
2019 हे वर्ष उत्तराखंड क्रिकेटसाठी मोठे यश देणारे ठरले होते. ऑगस्ट 2019 मध्ये क्रिकेट असोसिएशन ऑफ उत्तराखंडला बीसीसीआयकडून मान्यता मिळाली होती. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये असोसिएशनचे सचिव महिम हे बीसीसीआयचे बिनविरोध उपाध्यक्ष झाले. हि यांची बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सीएयूचे सचिवपद रिक्त झाले. सर्व सहमतीने हे पद भरण्याचा विचार होता. पण गटबाजीमुळे शक्य झाले नाही. त्यानंतर सचिवपदासाठी पुन्हानिवडणुका झाल्या आणि त्यात महिम विजयी झाले. महिम यांना बीसीसीआयमधील उपाध्यक्षपद किंवा सीएयूमधील सचिवपद यापैकी एकाची निवड करायची होती. महिम यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे ठरविले. महिम यांनी बीसीसीआयकडे राजीनामा पाठवला आहे. पण लॉकडाउनमुळे बीसीसीआयचे कार्यालय बंद असून त्यामुळे त्यांच्या राजीनामवर लॉकडाउननंतर निर्णय घेतला जाणार आहे.